गोविंद चांगदेव वने यांची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील गोविंद चांगदेव वने यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल त्यांचा व वडिलांचा क्रांतीसेनेकडून सत्कार करण्यात आला. 

            मनात जिद्द, परिश्रमाची तयारी असेल तर संकटेही रोखू शकत नाहीत. यश मिळतेच. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोविंद वने यांनी तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा २०२२ मध्ये दिली होती. त्यात यश मिळाले. शारीरिक चाचणीसाठी पात्र होत अंतिम गुणवत्ता यादी दि. ३० मे २०२४ रोजी घोषित झाली. सध्या ते पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. वडील चांगदेव व आई यमुनानानी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व साथ दिली.

          यावेळी क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब पवार, भाजपचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भिंगारदे, चांगदेव वने, क्रांतीसेनेचे युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, रंभाजी गावडे, हर्षद धोंडे, सोपान वने, आप्पासाहेब वने, दादासाहेब वने, सोमनाथ वने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here