कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु. कु.महेवीश मोहम्मद सय्यद हिची AIIMS अर्थात आँल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स बँचकरिता निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिलीआहे
AIIMS (आँल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स) बँचकरिता एकूण ९५० विद्यार्थ्यामधून एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या एकूण ५० विद्यार्थ्यापैकी कु.महेवीश हि एकमेव गौतम पब्लिक स्कूल स्टेट बोर्डची विद्यार्थिनी आहे. तिच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन माजी.आमदार अशोकराव काळे, विश्वस्थ आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य, शाळेचे प्राचार्य नूर शेख, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांनी तिंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.