गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या व्हाँलीबॉल संघाकडे विभागीय पातळीवर जिल्हयाचे नेतृत्व.

0

कोळपेवाडी वार्ताहर – जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय व्हाँलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि.२५.डिसेंबर रोजी त्रिमृर्ती क्रिडा सकुंल, नेवासा. येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या व्हाँलीबॉल संघाने विजेतेपद पटकावुन  जिल्हयाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे अशी माहिती माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
गौतमच्या संघाने अंतिम सामन्यात डि-पॉल पब्लिक स्कूल, (राहुरी) या संघाचा दोन सरळ सेटमध्ये २५-१३व २५-२२ ने पराभव केला. या विजयामुळे गौतमचा संघ विभागीय स्पर्धेसाठी जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे.
या विजयात संघासाठी मानसी देवरे, आयशा खान, श्रेया पटारे, दिपाली मोरे, प्रगती तासकर, प्राजंल ठाकरे, संजना पाटील, मृणाल श्रीरसागर यांनी उत्कृष्ट खेळ केला.
गौतम पब्लिक स्कूलच्या संघास शाळेचे फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक, व्हाँलीबॉल प्रशिक्षक  राजेंद्र आढाव क्रिडाशिक्षक रमेश पटारे, सोहेल शेख यांचे बहुमोल मार्गदर्शन  लाभले.
  सदर स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकरावजी काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच संस्थेचे सर्व सदस्य व पालक व माजी विद्यार्थी यांनी सर्वांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here