कोपरगाव( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या संचालक पदी सोनेवाडी येथील बापूराव दगुराव जावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी यांनी गेल्या पंधरा वर्षात बापूराव जावळे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या विशेष सहभागाबद्दल त्यांची गौतम बँकेच्या संचालक बोर्डात संचालक म्हणून नाव पुढे आणले. कोअर कमिटीच्या बैठकीत बापूराव जावळे यांची गौतम बँकेच्या संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली. संचालकपदी निवड झाल्याची बातमी सोनेवाडी परिसरात समजतात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्याचे स्वर्गीय दगूपाटील जावळे हेदेखील वीस वर्ष गौतम बँकेच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पुढील पिढीला काळे कुटुंबाने संधी देऊन गौतम बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करून काम करण्याचे संधी दिली. त्यांचा सोनेवाडी येथे सत्कार करण्यात आला यावेळी प्रा गीताराम जावळे, अर्जुन जावळे ,प्रभाकर जावळे ,आबासाहेब दहे, दिगंबर जावळे, आबासाहेब गुरसाळ, बाळासाहेब जावळे, राजेंद्र जावळे ,अण्णासाहेब जावळे, सयराम गुडघे, साहेबराव मिंड, जयवंत जावळे, नारायण जावळे अदी उपस्थित होते. सोनेवाडी पंचक्रोशीच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.