गौरव राळेभात यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड महाविद्यालय जामखेड चा खेळाडूं गौरव नामदेव राळेभात यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉल बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.हा खेळाडूं १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ  मंगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे आयोजित स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थ्यांस प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले  गौरव राळेभात यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष  उद्धव देशमुख, उपध्यक्ष  अरुण  चिंतामणी, संस्थेचे सचिव  शशिकांतजी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  डोंगरे एम एल , उप-प्राचार्य  डॉ. सुनिल नरके तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांनी गौरव राळेभात चे अभिनंदन करून मंगळूर विद्यापीठ मगलगोत्री कर्नाटक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here