कोपरगाव(वार्ताहर): केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात राबवित असताना ग्रामसेवक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडवी लागते. किचकट नियम व अटी तसेच ग्रामपंचायत येथील प्रशासनाला बरोबर घेऊन मध्य साधावा लागतो. ही तारेवरची कसरत जो यशस्वीपणे पार करतो तो सक्षम अधिकारी असतो. विजय जोर्वेकर यांनी आपल्या प्रदिर्घ सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अपुरे ठेवले नाही. सेवेत असताना अतिशय पारदर्शक काम त्यांनी केले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग गावोगावी काम करत असलेल्या ग्रामसेवकांनी करून घ्यावा असे आवाहन कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष जालिंदर पाडेकर यांनी केले.
ते काल कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे सदस्य ग्राम विकास अधिकारी विजय जोर्वेकर यांचा गौरव करताना बोलत होते.
मूळचे संगमनेर तालुक्यातील असलेले ग्राम विकास अधिकारी विजय जोर्वेकर यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सोनेवाडी येथे विना तक्रार अकरा वर्षे आणि एक दिवस ग्रामविकास अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. प्रशासकीय कार्यकाळाप्रमाणे त्यांची उद्या सेवानिवृत्ती होणार आहे. तेव्हा त्यांचा सर्वप्रथम कोपरगाव तालुका संघटनेच्या वतीने संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सोनेवाडी येथे जाऊन सत्कार केला.
यावेळी सरपंच शकुंतलाताई गुडघे, सरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, आबासाहेब जावळे, बबलू जावळे, कर्ना जावळे,संघटनेचे सचिव एन डी खेडकर, उपाध्यक्ष दिगंबर बनकर, मढीचे ग्रामसेवक रामेश्वर नेवगे, पोहेगांवचे ग्रामसेवक आर एस टिळेकर, देर्डे चांदवडचे ग्रामसेवक सुरेश राहणे, वेस सोयगावचे ग्रामसेवक अमोल निकम, श्री खेडकर, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते, दत्तात्रेय हळवर, शिवाजी शिंदे, मच्छिंद्र गुडघे, भाऊसाहेब खरे, सोमनाथ रायभान, सिताराम गांगुर्डे, लक्ष्मण ठाकरे, पुंजाहरी आव्हाड, सुमित पासलकर अदी उपस्थित होते. ग्रामसेवक संघटनेने कुठलीही कल्पना न देता सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आधीच विजय जोर्वेकर यांचा सन्मान केला त्यामुळे ते भारावून गेले होते. उभ्या आयुष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा जो आनंद झाला तो आनंद शब्दात सांगण्यासारखा नसल्याचे स्पष्ट करत उर्वरित आयुष्यात ग्रामसेवकांच्या कोणत्याही कामासाठी सदस्य तत्पर राहील असे विजय जोर्वेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुडघे यांनी केले तर आभार सरपंच शकुंतला गुडघे यांनी मानले.