अकोले – अकोले नगरपंचायतसाठी 15 व्या वित्त आयोगातील घनकचरा व्यवस्थापन व मशिनरी साठी अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी आयुष मंत्रालय व स्वास्थ मंत्री प्रतापराव जाधव यांचेकडे केली आहे.
मंडलिक यांनी नुकतेच नवीदिल्ली येथे अधिवेशन प्रसंगी आयुष मंत्रालय व स्वास्थ मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे कि अकोले (अहिल्यानगर) ची नगरपंचायत आदिवासी तालुक्यातील आहे. सदर पंचायतला गत 2 वर्षापासुन 15 व्या वित्त आयोगाचा पुरेसा निधी येत नसल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे घनकचर्याच्या व्यवस्थापनासाठी 15 व्या वित्त आयोगातुन अतिरिक्त निधी मिळावा. ज्यामुळे अकोल्यातील जनतेचे आरोग्य अबादित राहण्यास मदत होईल.
मंडलिक यांच्या या निवेदनावर भाष्य करतांना आयुष मंत्रालय चे स्वास्थ मंत्री प्रतापराव जाधव यांनी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी संबंधित विभागास आदेश करू असेही ते म्हणाले. 15 वित्त आयोगांतर्गत मिळणार्या अनुदानात नगर पंचायत आरोग्य सेवा बळकट करणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.