चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत ठरला पहिलाच देश , भारतियांनो मी चंद्रावर पोहचलो , आणि तुम्ही सुद्धा !
बेंगळुरू : “भारत देशा, आम्ही आमच्या इप्सित स्थळी पोहोचलो आहोत.” हा मेसेज आहे चंद्रयान ३ याने पृथ्वीवर पाठवलेला . आज संध्याकाळी ६ वाजता चंद्रयान ३ चे सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे झाले. त्यानंतर इस्रोच्या मुख्यालयासह संपूर्ण देशाने एकच जल्लोष केला . यासोबतच चंद्रावर पोहचणार भारत हा चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार पहिला देत ठरला आहे .याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान ३ च्या टीम सह शास्त्रज्ञांच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या .हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचं अभिनंदन केलं. दक्षिण आफ्रिकेतून मोदींनी भारतीयांशी संवाद साधला.
भारताच्या अवकाश संशोधनाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे, भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय. देशातील प्रत्येक व्यक्ती इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत आहे. भारताच्या चंद्रयानाने चंद्राला यशस्वी गवसणी घातली आहे. इस्रोचं चंद्रयान सुखरूपपणे चंद्रावर लँड झाले. याबाबत अधिक उत्सुकता असण्याचे कारण म्हणजे यापूर्वीचे चंद्रावर पोहचण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले होते त्यामुळे या तिसऱ्या चंद्रयान ३ मोहिमेबाबत मोठी उत्सुकता लागली होती . मात्र इसरोच्या शास्त्रज्ञांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते . आणि त्यांच्या या प्रयत्नांना आज यश मिळाले.
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागले. 14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेलं चांद्रयान-3 आज 40 दिवसांनंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं. भारताची ही ऐतिहासिक चंद्रमोहिम आहे. महत्त्वाचं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पानं जोडलं गेलं आहे.