कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण व जेऊर पाटोदा ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने संत श्री भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सकाळी नऊ वाजता भव्य कावड मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सात वाजता प्रकाश महाराज आव्हाड यांचे जाहीर हरी किर्तन झाले.
प्रकाश महाराज आव्हाड यांनी संत भगवान बाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत. संत भगवान बाबांनी केलेल्या कामाची माहिती सांगितली. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत भगवान बाबा मित्र मंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.