चांदेकसारेत शॉर्टसर्किटने ऊस पेटला ;लाखो रुपयांचे नुकसान

0

वीज वितरण कंपनीच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात दावा दाखल करणार.. ॲड होन

सोनेवाडी ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील डॉ. प्रसाद राजाभाऊ होन यांच्या तीन एकर ऊसाला काल वीज वितरण कंपनीच्या लोम्बकळत असलेल्या तारांच्या घर्घणाने शॉर्ट सर्किट झाले. यामुळे आग लागली. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेकवेळा या लोणकळत असलेल्या तारा ओढण्याचे व रोहित्र बदलीचे वीज वितरण कंपनीच्या  अधिकाऱ्यांना सांगितले असताना देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ऊस पेटला. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून वीज वितरण कंपनीच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात दावा दाखल करणार असल्याचे त्यांचे बंधू ॲड मधुकर साहेबराव होन यांनी सांगितले.

झगडेफाटा रांजणगाव रोड दरम्यान होन यांची 35  एकर जमीन आहे. सर्वे नंबर 160 मध्ये  डॉ प्रसाद राजाभाऊ होन यांनी 265 जातीच्या उसाची लागवड केली होती. गळीताला आलेला ऊस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला तोडून जाणार होता. मात्र अचानक शार्ट सर्किटने हा ऊस पेटला गेला.राजाभाऊ होन व त्यांच्या मजुरांच्या ऊस पेटला लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना आवाज देऊन बोलवले.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक  ॲड राहुल होन , शंकरराव चव्हाण,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संजय होन, बाजीराव वक्ते, साहेबराव होन, बारकू होन, सिताराम मोरे, श्री सुभाष ,राधाजी होन, डॉ प्रसाद होन ,राजाभाऊ होन यांनी घटनास्थळी येत परिस्थितीची पाणी केली. आजूबाजूला शंभर ते सव्वाशे एकर ऊस असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी ॲड राहुल रोहमारे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अग्निशमन बोलावले. तर संजय होन यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अग्निशमन बोलावले.अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी येत शर्तीचे प्रयत्न करत आग विझवली. 

या आगीमध्ये होन यांचा ऊस जळून खाक झाला . डॉ. प्रसाद होन यांनी वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारा ओढण्याची सूचना केली होती. तरी देखील त्यांनी तारा ओढल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोणी उरला का नाही ? असा प्रश्न निर्माण होतो आहे. ॲड मधुकर होन त्यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकारावर ताशेरे ओढत त्यांच्याच निष्काळजीपणामुळे ऊस पेटण्याचे सत्र सुरु असल्याचे सांगितले. मागील दोन वर्षांपूर्वी देखील शेजारी मते यांचा पाच एकर ऊस पेटला होता. तेव्हा वाटले होते की वीज वितरण कंपनी तारांच्या बाबतीत काही वेगळे नियोजन करेल मात्र तसे झाले नाही. शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून आपल्या शेतात पिकवलेले पीक जर असे हातातुन जात असेल तर आता शेतकरी शांत बसणार नसून वीज वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे ॲड मधुकर होन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here