चांदेकसारेत होन यांच्या घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला

0

पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा… स्थानिक ग्रामस्थांची मागणी

कोपरगाव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारींसह आता त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या लांबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी या चोरट्यांच्या प्रतापामुळे संकटात सापडला आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या परिसरातील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.काल चांदेकसारे येथील मारुती मंदिराच्या बाजूला राहत असलेले राजेंद्र पोपट होन यांनी घरासमोर लावलेल्या त्यांच्या मालकीच्या स्वराज 725 या ट्रॅक्टरची सोनी एक्साइड कंपनीची 7500 रुपये किमतीची बॅटरी चोरट्यानी लांबवली तर रोहन नानासाहेब गुरसळ यांनीही परिसरात आपल्या ट्रॅक्टरचे काम सुरू असल्याने आपला ट्रॅक्टर राजेंद्र होन यांच्या घरासमोर लावलेला होता त्या स्वराज 744 ट्रॅक्टरची सात हजार रुपये किमतीची बॅटरी  चोरट्यांनी लंपास केली.तर घारी येथील अब्बास पठाण यांच्या ट्रॅक्टरची बॅटरीही चोरटे घेऊन पसार झाले.काही दिवसांपूर्वी सोनेवाडीचे माजी सरपंच यांच्या ट्रॅक्टरची बॅटरीही चोरट्याने चोरली होती.ही घटना साधारण पहाटे तीन वाजता घडली असल्याचे राजेंद्र होन यांनी सांगितले. सकाळी ट्रॅक्टर्स चालू करण्यासाठी ते पुतण्या सचिन होन यांच्यासोबत गेले असता झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला.रात्रीच्या वेळी गावात अनोळखी वाहने व इतर कोणी आले का याची खातरजमा त्यांनी केली. बँक ऑफ इंडिया च्या रस्त्याला व्यापारी सुभाष लांडगे यांच्या सीसीटीव्हीमध्ये स्प्लेंडर गाडीवर चोरटे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी बघितले. सदर दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे फुटेज मध्ये जाणवते आहे.गेल्या काही दिवसापासून या परिसरात चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे चोरटे शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. शेतातील विद्युत मोटारी, केबल ,स्टँटर व व आता नव्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर वरील बॅटऱ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला याबाबत रीतसर फिर्याद दाखल करण्यात येणार आहे मात्र तालुका पोलीस स्टेशनने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या परिसरातून होते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here