चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव थेटरला बघितला छावा 

0

पोहेगांव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट कोपरगाव येथे मल्टिप्लेक्स थेटरला जात चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षका समवेत बघितला.

न्यू इंग्लिश स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनील होन, संस्थेचे संचालक शंकरराव चव्हाण, मुख्याध्यापक के डी होन, श्री मेहेत्रे, धनराज पवार, डी जी पवार, सुधाकर पवार, श्री त्रिभुवन, श्रीमती रणशुर, मुकेश पाटील, श्रीमती कानडे, श्रीमती लोंढे, सुनील पवार, आकाश कौठे, विनायक जावळे अदी यावेळी उपस्थित होते. 

सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना हा चित्रपट बघण्यासाठी थिएटर उपलब्ध करून देण्यात आले होते. सकाळी आठ ते दुपारी बारा हा शो विद्यार्थ्यांनी बघितला. 

पूर्ण थिएटरमध्ये चांदेकसारे विद्यालयाचेच विद्यार्थी दिसत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर औरंगजेबाने केलेला अत्याचार पाहून विद्यार्थ्यांना रडू अनावर झाली होते. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय घोषाने थिएटर दणदणून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here