चादेकसारेत सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न…

0

सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे श्री भैरवनाथ जोगेश्वरी शेतकरी मित्र परिवाराच्या वतीने‌ सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न झाली.श्री भैरवनाथ जोगेश्वरी कॉम्प्लेक्स मध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक कल्याण होन यांनी या शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गणेशजी सानप यांनी जमीन वाचवण्यासाठी सामुहिक प्रयत्न होने गरजेचे असून सातत्याने रासायनिक खताचा होणारा भडीमार थांबायला हवा. जैविक खताची वापर करून शास्त्रीय पद्धतीने  शास्वत उत्पन्न घेता येते . आॉरगनिक फारमिग ही काळाची गरज असल्याचे यावेळी त्यानी सांगितले. जैविक अभ्यासक  राहुल जाधव यांनी वेगवेगळ्या पिकाबाबद माहिती दिली. सातत्याने रासायनिक खताचा होणारा भडीमार थांबायला हवा. जैविक खताची वापर करून शास्त्रीय पद्धतीने  शासवत उत्पन्न घेता येते . आॉरगनिक फारमिग ही काळाची गरज असल्याचे यावेळी त्यानी सांगितले. यावेळी हभप मनसुक महाराज दहे. सरपंच किरण होन उपसरपंच सचिन होन .नारायण दादा होन अर्जुन होन,धिरज बोरावके, राजेंद्र होन, मनराज होन मलूआपा होन.  हसन भाई सय्यद. बबलू भाई शेख द्रोणाचार्य होन व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते .हसन सय्यद यांच्या टोमॅटो शेतीला यावेळी भेट देण्यात आली. कल्याण होन यांनी सध्याची पावसाची परिस्थिती कथन करताना शेतकऱ्यांना आवर्षण प्रवर्षण भागाचा मोठा सामना करावा लागतो असे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांची शेती समृद्ध होण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेल्या पाण्याचे नियोजनाप्रमाणे आताच्या सरकारने पावले उचलायला हवी असे त्यांनी सांगितले. सध्या परिसरामध्ये संपूर्ण शेती पिके जळून गेली असून या पिकांचा देखील पंचनामा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here