कोळपेवाडी वार्ताहर :- चित्रकला हि परमेश्वराची देणगी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कला उपयोगी पडते. सततचा सराव व निर्मिती मुळे कलेला मूर्तरूप प्राप्त होत असून उदयोन्मुख चित्रकारांसाठी चित्रकला स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व स्वराज्य निर्माता प्रतिष्ठाण कोपरगाव यांच्या वतीने माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्पर्धा कोणतीही असो या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर स्पर्धकाला आपल्या उणिवांची व आपल्या क्षमतेची जाणीव होते. त्यामुळे ज्यांच्याकडे कला, कौशल्य आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. अशा स्पर्धेतून मिळाल्या यश अपयशातून भविष्यात आयुष्याचे रंग बदलण्याची संधी स्पर्धकांना प्राप्त होत असून अशा स्पर्धा राबविणे स्तुत्य उपक्रम असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले व सहभागी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, स्वराज्य निर्माता प्रतिष्ठाणचे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष निखील डांगे, अक्षय आंग्रे, प्रदीप थोरात, रोहित गायकवाड, चेतन पन्हाळे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब रुईकर, वाल्मीक लहिरे, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनार, विकी जोशी, निलेश डांगे, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव, नंदकुमार डांगे, राजेंद्र आभाळे, विकास बेंद्रे, शुभम लासुरे, मनोज नरोडे, संदीप देवळालीकर, नितीन साबळे, राजेश शहा, नारायण लांडगे, गणेश बोरुडे, सचिन गवारे,किरण बिडवे, कैलास मंजुळ, मुकुंद इंगळे, अक्षय बोरा, रोहित खंडागळे, वैभव भुतडा, सागर लकारे, जनार्दन शिंदे, डॉ.दिलीप जगताप, अझरुद्दीन शेख, प्रदीप कुऱ्हाडे, शितल वायखिंडे, रुपाली कळमकर, सुषमा पांडे आदींसह सहभागी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.