देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
थकीत कर्ज वसूलीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने राहुरी तालूक्यातील त्रिंबकपुर येथील कोळसे वस्ती येथील एक घर सील करण्यात आले होते. मात्र कर्जदारांनी अनाधिकृतपणे सदर सील तोडून घरावर ताबा घेतला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत समजलेली माहिती अशी की,किशोर ईश्वरलाल पाटील, वय ४८ वर्षे, रा. कोथरुड, ता. हवेली, जि. पुणे, हे अल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा. लि. सी. टी. एस. नं. १०७४, प्लॉट नं. ४२६/१ गोखले रोड, मॉडेल कॉलनी पुणे येथे वरिष्ठ अधिकारी म्हणुन नोकरीस आहे.त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, फायनान्स कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून राहुरी तालूक्यातील त्रिंबकपुर येथील कोळसे वस्ती येथील बाबासाहेब शिवाजी कोळसे व शिवाजी यादव कोळसे यांचे नावावर असलेल्या गट नं. ६७/२/२ ग्रामपंचायत मिळकत १६५ चे क्षेत्रफळ ३ हजार चौ. फुट त्यावर आरसीसी बांधकाम या मिळकत १३ मार्च २०२४ रोजी ताब्यात घेऊन सील केली होती.
दि. १९ एप्रिल २०२४ रोजी फायनान्स कंपनीचे ताब्यात घेतलेल्या मिळकतीची पाहणी करण्यासाठी किशोर पाटील काल गेले होते. सदर ठिकाणी कर्जदार यांनी घराचे सील तोडुन आत प्रवेश करुन वास्तव्यास असल्याचे दिसुन आले.
किशोर ईश्वरलाल पाटील यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब शिवाजी कोळसे व शिवाजी यादव कोळसे, दोघे रा. कोळसे वस्ती, त्रिंबकपुर, ता. राहुरी, यांच्यावर गून्हा रजि. नं. ७४०/२०२४ भादंवि कलम ४४७ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.पुठढील तपास पोलिस करीत आहे.