कोपरगाव:-प्रतिनिधी (अशोक आव्हाटे)
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इनडोअर गेमहॉल प्रांगणात र.म.परीख सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात जागतिक ग्रंथ दिना निमित्ताने बाल कुमार ज्ञान कोपरा हा उपक्रम मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कुल मधील शिक्षिका पल्लवी आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका व शहरातील विविध भागातील बाल गोपाळ विद्यार्थ्यांनी हजेरी लावून या कार्यक्रमात आपली हजेरी लावली.
साध्याच्या आधुनिक जगात मुलांचे वाचन सांस्कृती कडे दुर्लक्ष होत असून भारतीय प्राचीन ग्रंथ व साहित्य परंपरा ही युवा वर्गाकडून दुर्लक्षित होत असल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ लहान वयातच राबविण्याचा हा प्रकल्प निश्चित वाचन संस्कृती ला बळकटीला प्रेरणा देणारा आहे.
ही संकल्पना कोपरगाव तालुक्यात सर्व ग्रामीण व शहरातील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालया मध्ये राबविला तर निश्चितच याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील अशी भावना सर्व सामान्य वाचक प्रेमी नागरिकांत होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन र.म.परिख सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाचे कार्याध्यक्ष पद्मकांत कुदळे,गोरे सर तसेच ग्रंथपाल योगेश कोळगे व सहाय्यक प्रमोद येवले यांनी केले होते.