संगमनेर : ८ मार्च जागतिक महिला दिन, या महिला दिनानिमित्त संगमनेरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हार,गुच्छ आणि शुभेच्छा देऊन महिलांचा सन्मान,सत्कार करण्यात आला.
संपूर्ण जगात प्रगतीच्या बाबतीत महिलांचा पुरुषां एवढाच बरोबरीचा वाटा आहे, सर्वच क्षेत्रात योगदान आहे. आपल्या देशातही महिलांना समान हक्क व पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्याची संधी मिळाल्याने महिला पुढे जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात देखील महिलांचा नेहमीच आदर, मान,सन्मान राखला जातो व महिलांना संधी दिली जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संपर्क नेत्या शुभांगीताई पाटील, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा सन्मान सोहळा महावितरण कार्यालयाजवळील गणपती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बोराडे, शुभांगी पगारे ,स्नेहा नवले, कोमल दामनी, स्वाती क्षीरसागर, पूजा मुंगसे, राज्यश्री भंडारी, अमृता कपेॅ, सुफला तांबे, संध्या पावनखड, संगीताताई गायकवाड, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, जयश्री शेंडे यांचा सन्मान शिवसेना शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठारभाग तालुकाप्रमुख संजय फड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख राजू सातपुते ,अनुप म्हाळस, शाखा प्रमुख अजीज मोमीन, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त करत संगमनेर शिवसेनेचे आभार मानले.