जामखेडचा भुतवडा तलाव पुर्ण क्षमतेने भरून ओसंडुन वाहु लागला

0

कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने तलावातील पाण्याचे जलपुजन,जामखेड करांच्या पिण्याचा प्रश्न सुटला मात्र पाणी जपुन वापरा संजय कोठारी

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा आणि जामखेड चा आत्मा समजला जाणारा  भुतवडा तलाव झालेल्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरला असून ओसडुन वाहु लागला आहे तसेच तलावाच्या उगम भागा कडून अजून जोरात पाण्याचा ओघ चालूच आहे या मुळे जामखेड शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने सर्व सामान्याच्या चेहऱ्या वर समाधान दिसून येत आहे तसेच हा तलाव ओसंडून वहात आहे याचे समाधान व आनंद व्यक्त करण्यासाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या मित्र समुहास बरोबर घेऊन यांच दुथडी भरलेल्या भुतवडा तलावातील पाण्याचे विधी वत जलपूजन केले.

साधारण पन्नास वर्षांपूर्वी जामखेडच्या भुतवडा तलावाचे काम स्वर्गवासी बन्सीलाल कोठारी यांनी केले होते त्यामुळे आजतागायत जामखेडला पाणी कमी पडले नाही तसेच भारतीय जैन संघटनेमार्फत प्रफुल्ल सोळंकी आणि संजय कोठारी यांनी दोन वेळेस याच तलावाचा गाळ काढून शेतकऱ्यांना दिलेला आहे सध्या या तलावात पाण्याची क्षमता वाढली असून यावेळी बोलताना कोठारी म्हणाले या अगोदर बऱ्याचदा भुतवडा तलाव भरल्याने आम्ही कोठारी प्रतिष्ठान मार्फत जलपूजन केले

 आज सर्व शहर वासियाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे मात्र पाणी सर्वांनी जपुन वापरले पाहीजे असे विचार संजय कोठारी यांनी यावेळी उपस्थित केले.  यावेळी कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, राजेंश मोरे, नरेंद्र आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here