जामखेडमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व नवनियुक्त खासदारांचा सत्कार

0

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

जामखेड तालुका प्रतिनिधी – महाविकासआघाडीचे धाराशिव लोकसभा मंतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा कर्जत जामखेड मतदारसंघाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार असून यावेळी जामखेडमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम जामखेडमध्ये नवीन नगर परिषदेसमोर, खर्डा रोड इथे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) दुपारी १ वाजता होणार आहे.

    धाराशिव मतदारसंघातून महाविकासघाडीचे उमेदवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) ओमराजे निंबाळकर हे ३ लाखाहून अधिक इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. त्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येत आहे. नुकतेच आमदार रोहित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी खासदार डॉ.अमोल कोल्हे (शिरूर),  निलेश लंके (अहिल्यानगर) व धैर्यशील मोहिते पाटील (माढा) यांचा सत्कार केला होता. यावेळी ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार करण्यात येणार असून खासदार निलेश लंके हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

     

आमदार रोहित पवार यांनी कोट्यावधी रुपये मंजूर करून आणलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरपरिषद इमारत, पंचायत समिती इमारत, नाना-नानी पार्क, सामाजिक सभागृह, सार्वजनिक वाचनालय या एकूण ८२ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच ६७ कोटी रुपये खर्चाच्या भूमिगत गटार योजनेच भूमिपूजनही यावेळी होणार आहे.  नागरिकांना शासकीय कामात येणाऱ्या अडचणी ओळखून जामखेड नगरपरिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत असावी म्हणून आमदार रोहित पवार यांनी प्रयत्नपूर्वक निधी मंजूर करून आणला व या दोन्ही इमारतीचे काम पूर्ण केले.  यामुळे प्रशासकीय कामात सुलभता येईल आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होईल आणि नागरिकांनाही चांगली सेवा मिळेल. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि लहान मुलांना खेळण्यासाठी अद्ययावत असे नाना-नानी पार्क बनवण्यात आले आहे. तसेच लग्न समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जामखेडमध्ये पूर्वी कोणतीही सुविधा नव्हती. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सामाजिक सभागृह बांधण्यात आल्याने ती अडचणही आता दूर झाली आहे. मतदारसंघातील स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षेची तयारी कऱणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सार्वजनिक वाचनालयही सुरु करण्यात आले आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गेल्यावर्षी मतदारसंघातील १० हजार गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना ३ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर शाळेत चालत यावे लागते अशा विद्यार्थ्यांना १० हजार सायकलचे वाटप करण्यात आले होते. तशाच पद्धतीने आणखीही काही विद्यार्थ्यांनी मागणी केली, त्यानूसार योग्य नियोजन करून आणखी ४ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here