जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड शहरात बी.एच.एम.एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या च्या विद्यार्थ्यांनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तीने आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजु शकले नसुन ती मुळची नागपूर येथील रहिवासी आहे.
याबाबत माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे पाठवण्यात आला आहे.
सदर आत्महत्या ग्रस्त विद्यार्थींनी डींपल गणेश पाटील वय २२ रा. अंबेकर गार्डन च्या बाजुला, नागपूर हल्ली रहाणार तपनेश्वर गल्ली जामखेड मुकुंद जवकर यांच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भाडे तत्त्वावर राहात होती. व जामखेड शहरालगत असलेल्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अगदी काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या वर्षाच्या थिअरीचे पेपर झाले होते. व प्रॅक्टीकल सुरू होते. सदर विद्यार्थीनीच्या मैत्रीणी कालच बाहेरगावी गेल्या होत्या. मात्र या मुलींने आत्महत्या कधी केली हे समजले नाही.
मुलींच्या आईने ती फोन घेत नसल्याने डिंपल हिच्या रुममध्ये राहणाऱ्या ईतर मुलींशी संपर्क केला तेव्हा हा प्रकार लक्षात आल्याने तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क केला असता. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले व डिंपल पाटील हिचा लटकलेला मृतदेह खाली उतरला व सर्व कायदेशीर कार्यवाही करून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून. सदर मयत मुलीची आई व नातेवाईक नागपूर येथून जामखेडकडे निघाले असून ते आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती समजताच मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हेही तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी नेहमीच प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आवश्यक ती मदत केली. तसेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्यासह पोलीस नाईक संजय लोखंडे, सचिन पिरगळ, पोलीस कॉ. अरूण पवार, सतीश दळवी, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे आदी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच महिला दक्षता समितीच्या रूक्साना पठाण यावेळी उपस्थित होते जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली