जामखेड कोर्ट रोड येथे महाप्रसादाचे रविवारी आयोजन

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :

                       जामखेड शहरातील जुने कोर्ट रोड येथील आरंभ फाऊंडेशन व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दि १५ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरंभ फाउंडेशन व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

         

  जामखेड शहर सह तालुक्यात सध्या गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु असून कोर्ट रोडवरील आरंभ फाउंडेशन व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी वायफट खर्चास फाटा देत कर्जत  जामखेडचे आमदार रोहित पवार मित्र मंडळ व युवा उदयोजक आकाश बाफना यांच्या सहकार्याने  सामाजिक भावनेतून महाप्रसादाचे आयोजन लोकमान्य वाचनालय येथे दि. १५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ठेवण्यात आले आहे या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here