जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा 

0

 

जामखेड तालुका प्रतिनिधी 

 बातमीला फार मूल्य असतं. अचुक माहितीच्या आधारावर समाजाला न्याय देण्यासाठी केलेल्या बातमीला पवित्र मानलं जातं. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, समाजात अपेक्षित परिवर्तन घडवून आणण्यासाठी केली जाणारी चळवळ म्हणजे पत्रकारिता आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार रामस्वामी नायकर इत्यादी राजकीय नेते पत्रकार व संपादकही होते. त्यांच्या त्यागमय पत्रकारीतेमुळे देशात समाज जागृती झाली अन् देश स्वतंत्र झाला. मात्र सध्या काही लोकांकडुन पैसा हेच पत्रकारितेचे उद्दीष्ट्य मानले जात आहे. अशा पत्रकारांमुळे ध्येयनिष्ठ पत्रकारिता लोप पावत आहे. त्यामुळे देशात लोकशाही टिकविण्यासाठी पत्रकारीतेची विश्वासार्हता, तत्त्वे, नितीमूल्ये सगळ्यांनी जपली पाहिजेत. असे प्रतिपादन पत्रकार यासीन शेख यांनी केले. 

     दि ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जामखेड पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जामखेडचे माजी संरपच तथ जेष्ठ पत्रकार सुनील कोठारी, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, अशोक निमोणकर, मिठ्ठूलाल नवलाखा, सहसचिव समीर शेख, मोहीद्दीन तांबोळी, संतराम सुळ, यासीन शेख, बाळासाहेब वराट, किरण शिंदे, फारूक शेख, नंदु परदेशी, संतोष नवलाखा आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

   यावेळी उत्कृष्ट शोधपत्रकारीतेबद्दल पत्रकार यासीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा सहचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल आशोक निमोणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहीद्दीन तांबोळी व तसेच   लहान वयात चांगल्या पध्दतीने निर्भीड लिखाण करूण गोरगरीबाना न्याय मिळवून देणारे समीर  शेख यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांच्या सुचनेनुसार दिवंगत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम बागडे व राजेंद्र शेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संजय कोठारी, नासीर पठाण, मोहिद्दीन तांबोळी, यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here