जामखेड येथिल हेल्थ दातांचा दवाखाना डेंन्टल क्लिनिक येथे १४ व १५ ऑगस्ट रोजी मोफत दंत तपासणी व एक्स रे शिबीराचे आयोजन 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जामखेड येथिल हेल्थ दातांचा दवाखाना डेंन्टल क्लिनिक येथे १४ व १५ ऑगस्ट रोजी मोफत दंत तपासणी व एक्सरे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मोफत शिबिराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हिरडीरोग व दंदरोपन शास्त्र तज्ञ डॉ सागर शिंदे यांनी केले आहे. 

दातांची उत्तमरीत्या काळजी घेणे हे कोणत्याही व्यक्तिला तितकेच महत्त्वाचे आहे, जेवढे कि त्याच्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दातांची उत्तमरित्या काळजी घेतली तर हेच दात चांगल्या प्रकारे राहतील याच अनुशंगाने जामखेड येथे नवीन बस स्टँड समोरील रमेश खाडे नगर, जामखेड या ठीकाणी आसलेल्या हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मध्ये दि. १४ व दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी  मोफत दातांची तपासणी व एक्स रे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या या डेंटल क्लिनिक मध्ये डिजीटल एक्सरे द्वारे दंत रोगाचे अचुक निदान व उपचार, वेदनाविरहित रूट कॅनाल ट्रिटमेंट दात बसवणे, (पक्के दात व कवळी ), अक्कल दाढ व हिरडयांची शस्त्रक्रिया, दातामध्ये चांदी भरणे, दात साफ करणे, तारांच्या साह्याने दात सरळ करणे अशा सुविधा उपलब्ध आहेत. 

शिबिरामध्ये सर्व उपचार एमडीएस डॉक्टरांकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या मोफत दंततपासणी व एक्स रे शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन हेल्थ दातांचा दवाखाना

सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चे संचालक डॉ. सागर कुंडलिक शिंदे व  हिरडीरोग व दंतरोपन शास्त्र तज्ञ व डॉ. सौ. मयुरी सागर शिंदे, दंत रोग तज्ञ रूट कॅनाल स्पेशालिस्ट यांनी केले आहे. डॉ.पूजा जवकर या देखील पेशंट तपासणी करणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here