जामखेड वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड प्रमोद राऊत 

0

उपाध्यक्षपदी अमीर पठाण तर सचिवपदी अक्षय वाळुंजकर

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुका वकील संघाच्या २०२५ साठी कार्यकारी मंडळांची निवडणूक पार पडली.ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यामुळे कोण विजयी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते मात्र  वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने अध्यक्षपदी अँड प्रमोद राऊत,उपाध्यक्षपदी अँड अमीर पठाण सचिवपदी अँड अक्षय वाळुंजकर,महिला सचिव अँड गायत्री डोके,ग्रंथपालपदी अँड अशोक कुंभार यांची बिनविरोध तर खजिनदारपदी निवडणूक होऊन यामध्ये अँड अजिनाथ जयभाय हे विजयी झाले

   

तालुक्यातील वकिलांची संघटना ही विविध उपक्रम राबवत असताना पक्षकार आणि न्यायाधीश यांच्यातील दुवा असणाऱ्या वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असते.  जामखेड वकील संघाची दि ०२ रोजी बैठक होऊन दि ०३ ते २० डिसेंबरपर्यंत  निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता यामध्ये अध्यक्षपदासाठी अँड प्रमोद राऊत अँड संग्राम पोले,अँड हर्षल डोके,अँड प्रवीण सानप,अँड नितीन राजपुरे,अँड अमर कोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर अँड संग्राम पोले,अँड हर्षल डोके,अँड प्रवीण सानप,अँड अमर कोरे यांनी आपल्या मित्रासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अँड प्रमोद राऊत,अँड नितीन राजपुरे यांच्या लढत होती मात्र ऐनवेळेस उमेदवार अँड नितीन राजपुरे यांनीही  अँड राऊत यांना पाठींबा दिल्याने दि १४ रोजीच अध्यक्षपदी प्रमोद राऊत यांच्यासह उपाध्यक्षपदी अमीर पठाण सचिवपदी अक्षय वाळुंजकर,महिला सचिव अँड गायत्री डोके,ग्रंथपालपदी अँड अशोक कुंभार यांचीही बिनविरोध करण्यात आली तर मात्र एकमेव खजिनदारपदासाठी निवडणूक दि २० डिसेंबर रोजी होऊन यामध्ये अँड अजिनाथ जयभाय अँड एस टी गायकवाड यांच्यात  मतदान होऊन यामध्ये अँड अजिनाथ जयभाय हे विजयी झाले.  यानंतर सर्व विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.

निवडणूक अधिकारी म्हणून अँड व्ही वाय पाटील  तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अँड अँड पी जे थोरात यांनी काम पहिले वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला अनुभवी व ज्येष्ठ वकिलांनी यामध्ये पुढाकार घेतला यावेळी उपस्थित वकील संघाच्या सर्व सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा व कार्यकारिणीचा सत्कार केला.यावेळी बोलताना अँड हर्षल डोके म्हणले कि -आमचे वकील संघाची सालाबाद प्रमाणे दरवर्षी निवडणूक घेण्यात येते हि निवडणूक ही अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात येते या निवडणुकीमध्ये कुठेही जातीयवादाला थारा दिला जात नाही तसेच कुठेही पक्षीय राजकारण आणले जात नाही आणि सदरची निवडणुक अतिशय खेळीमेळीचे वातावरणात पार पडली .

                           यावेळी नूतन अध्यक्ष  अँड प्रमोद राऊत म्हणाले, नूतन पदाधिकारी हे वकील संघातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करतील. न्यायालयात दैनंदिन कामकाज करतांना वकिलांना येणाऱ्या अडीअडचणी त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील. न्यायालयात येणार गरजवंत पक्षकाराला न्याय मिळून देण्यासाठी वकील संघामार्फत कशी मदत करता येईल, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू. न्यायालयाच्या प्रलंबित खटल्याचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी वाढीव न्यायालयीन प्रणाली कशी उपलब्ध होईल, त्यासाठीही आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here