जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर तर अप्पर अधीक्षक आणि उपाधीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

0

मुख्यमंत्री शिंदे यांची बुलडाण्यात घोषणा

जालना (प्रतिनिधी) – मागील चार दिवसांपासून अंबड तालुक्यातील शांततेत उपोषण सुरू असताना शुक्रवारी घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून एका व्यक्तीला दवाखान्यात शिफ्ट करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा कशाला, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित होत आहे. त्याचबरोबर शांततेत चर्चा सुरू असताना आठ ते दहा पोलिसांनी एका एका व्यक्तीला घेरून एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठी चार्ज का केला? ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्ती अचानक पोलिसांवर कधीही दगडफेक करत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसक का झाला हा देखील अनुत्तरीत प्रश्न आहे.

        आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यामुळे जालना जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य पेटून उठल्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ दगडफेक यासह अनेक प्रकार पाहायला मिळाली… नेमकी या लाठी चार्ज मागील पार्श्वभूमी जरी करू शकली नाही तरी देखील याचे खापर हे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या डोक्यावर फोडण्यात आले आहे.  जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे आणि अप्पर अधीक्षक आणि उपाधीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करीत असल्याचे बुलडाण्याच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर जाहीर केले .

 जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या गजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला असून अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर  बदल्या करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. जालना येथील लाठीहल्लाप्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) श्री सक्सेना यांच्यामार्फत करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे.

कोणत्याही पक्षाचे असो ते राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठा कहर करून ठेवतात आणि यामध्ये मारला जातो तो सामान्य माणूस आणि सामान्य माणसाचे रक्षण करण्यासाठी उभा राहणारा तो…. पोलीस….. दंगलीत जाळपोळ दगडफेक यासह अनेक कृत्य आपल्याला पाहायला मिळतात या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड नेमका कोण असतो हे शेवटपर्यंत समजत नाही मात्र यामध्ये हरपलेल्या जातीची जनता आणि बळीचा बकरा बनल्या जातो तो पोलीस… कोणत्या एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी राजकीय दबाव आणून पोलिसांच्या चौकशी, बदल्या आणि निलंबन यासारख्या कारवाया करण्यात येतात…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here