केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात ग्रामपंचायत अग्रस्थानी
सोनेवाडी (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायतीला शनिवारी 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना राबवल्याची माहिती घेतली असता. चोख नियोजन व कागदपत्रांची ती पूर्तता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची प्रशंक्षा केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1991 पासून पोहेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्याने महत्त्व देण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना राबवून जिल्ह्यात आपले अव्वल स्थान मिळवले आहे.
कुठलीही पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहेगाव गाठले. मात्र कामाची सुसूत्रता पाहिल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.या व्यतिरिक्त पी.एम.विश्वकर्मा,वयोश्री योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा ग्रामपंचायत कामाचा आढावा घेतला व समाधान व्यक्त करून प्रशंसा केली तसेच पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी उपसरपंच अमोल औताडे, ग्रा.पं.सदस्य सचिन औताडे,राजेंद्र औताडे, प्रशांत रोहमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवडे ,पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पाठक ,नायब तहसिलदार श्रीमती.प्रफुल्लिता सातपुते, पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, पंचायत समिती विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, विस्तार अधिकारी प्रशांत वाघमारे, तालुका समन्वयक महाऑनलाईन नितीन मोरे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर आदी उपस्थित होते.उपसरपंच अमोल औताडे यांनी उपस्थित मान्यवराचे आभार मानले.