कोपरगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राम्हणगाव येथे आज आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिन्याचा दुसरा रविवार हा आजी आजोबा यांच्याबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे .यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे आजी आजोबा पालक उपस्थित होते.
याप्रसंगी माजीसरपंच माननीय शोभाताई बनकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमापुजनाने केली आजी-आजोबा म्हणजे नातवासाठी दूधावरची साय असते .आपल्या कष्टाने संस्काराने नातवांवर माया करत असतात. विद्यार्थ्यानी आजी आजोबांचे पाय धुतले त्यांच्या पाया पडले त्यांचा हार गुलाबपुष्प नारळ देऊन सत्कार केला आजी आजोबानी संगीत खुर्ची खेळ खेळला जात्यावर धान्य दळत ओव्या गात विद्यार्थ्यांना ऐकवल्या ओव्या तोंडपाठ पाहून मुले आश्चर्य चकीत झाली आजी आजोबांना फराळ म्हणून खिचडी केळी राजगिरा लाडू विद्यार्थ्यांनी वाटप केले आपुलकी जिव्हाळा माया ममता या गोष्टींची जाणीव झाली.आजी आजोबा दिन कार्यक्रमासाठी ,सुशाई सांगळे, वैशाली बनकर, ज्योती इनामके,माजी सरपंच ठकुबाई सोनवणे,सुदाम सोनवणे, शिवाजी सांगळे, पंढरीनाथ सांगळे,अलका सांगळे, माजी सरपंच शोभाताई बनकर, मीराबाई जाधव,परसराम जाधव, परसराम मगर, गयाबाई मगर,शरद सांगळे,सुबाई भोसले, मुक्ताबाई पवार, बबन पवार, सुनिता माळी,सुल्याबाई मोरे,फुल्याबाई भुजबळ, इत्यादी पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आजी आजोबा दिनांचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक वाकचौरे ज्ञानेश्वर यांनी प्रास्ताविकात आजी आजोबा दिनाच्या निमित्ताने महत्त्व सांगितले श्रीमती मनिषा जाधव , महेंद्र निकम यांनी आलेल्या आजी आजोबांचे आभार मानले.