नगर – जिल्हा पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी युवा नेते अक्षय कर्डिले तर सचिवपदी सौरभ बल्लाळ तर खजिनदारपदी मनोज गायकवाड यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष अक्षय कर्डिले म्हणाले, जिल्हा पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवून जी जबाबदारी दिलेली आहे ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. यापुढील काळात नगरमध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करु. त्या माध्यमातून नगरमधील खेळाडूंना व्यासपीठ निर्माण होईल. नूतन सर्व पदाधिकारी संघटनेच्या कामात योगदान देत खेळाडूंच्या अडचणी सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपध्यक्षपदी किशोर कालडा (संगमनेर), मनोज नवले (श्रीरामपूर), धनंजय पाटील (शिर्डी), सुरज भराट (नगर), सहसचिव-लवन गालेपल्ली, खजिनदार-मनोज गायकवाड, संयोजक सचिव बाबासाहेब बर्वे (संगमनेर), निलेश सुरासे (कोपरगांव), कु.सोनाली साबळे, (नगर) निष्णात गिल्डा (नगर), राजेश पुंडे (नगर). सदस्य – प्रियांश यादव (नगर) शुभम चव्हाण (नगर), भरत चिपाडे (नगर), सागर कोळगे (संगमनेर), विजय मेहेत्रे (श्रीगोंदा), शुभम शेवाळे (पारनेर) आदिंची निवड करण्यात आली.
जिल्हा पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग संघटनेस महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन (नागपुर), महाराज्य राज्य क्रीडा परिषद, महाराष्ट्र शासन यांच्याशी संलग्नता मिळाली आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य क्रीडा व खेळ परिषद यांची मान्यता असलेली ही एकमेव संघटना आहे.
येत्या 27 ऑगस्ट 2023 रोजी किंग्ज जिम, बुरुडगांव रोड, नगर येथे नूतन अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या नियोजनाखाली ओपन बेंच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे नूतन सचिव सौरभ बल्लाळ यांनी सांगितले.