पञकार परीषदा घेवून विकासाचे प्रश्न सुटणार का?
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील आजी माजी आमदार खासदार,नगराध्यक्ष,नगरसेवक नुसत्या वल्गना करीत आहे.केवळ कोटीच्या बाता केल्या जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्था अनेक संस्थांचा कारभार प्रशासकाकडून हाकला जात आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी सांडपाण्याचे नियोजन या समस्यांबाबत राजकीय नेत्यांकडून कोट्यवधी रूपयांच्या निधीच्या बाता होत असताना अजूनही विकास कामांच्या वाटा शोधत असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारो मध्ये प्रत्येकजण कोट्यवधी रूपयांचा विकास केल्याचे सांगत आहे परंतु जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न अजूनही अंधांतरीच असल्याने पेटलेल्या राजकारणाने जिल्ह्यातील विकास कामाला उजाळा येण्याची अपेक्षा लागली आहे.रस्त्याच्या कामांसाठी राजकीय नेत्यांनाच उपोषणाचे हत्यार उपसावे लागले याची खंत हि राजकारणात उमटली आहे.कोट्यावधीच्या बाता मारल्या जात असल्या तरी विकासाची वाट न सापडल्याने राज्यकर्त्यांनी टेलर दाखवायचे काम केले आहे. तर राज्यकर्त्यांना पिच्चर दाखवायचे काम जनता जनार्धन सार्वञिक निवडणूकीत केल्या शिवाय राहणार नाही.
सध्या विकास कामा वरुन भाजप व महाविकास आघाडीत चांगलीच जुंपली आहे. कोट्यावधी रुपयांच्या बाता मारण्यात राजकीय स्पर्धा लागली आहे. माञ राज्यकर्त्यांना विकासा वाटा सापडेना.राहुरी तालुक्यातील राहुरी शहर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपालिकेवर आजपर्यंत तनपुरे गटानेच एकहाती सत्तेचा वरचष्मा राखला आहे. राहुरीत विधानसभेसह पंचायत समिती व तनपुरे कारखान्याबाबत नेहमीच सत्तांतर झाले, परंतु पालिकेमध्ये अजूनही तनपुरे गटाला सत्तेतून पायउतार करण्यात विरधकांना यश आले नाही.दरम्यान, मागील नगरपरिषदेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या वतीने नगराध्यक्षपदावर प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील गटार व अंतर्गत रस्त्याचा प्रश्न पर्णी लावताना सर्वाधिक नगरसेवक नवडून आणले. नगराध्यक्ष असतानाच तनपुरे यांना पालिका टू विधानसभा जाण्याची संधी लाभली. केवळ आमदारच नव्हे तर नामदार होत आले. त्यांनी सहा खात्यांचे राज्यमंत्री मिळविले. त्यामध्ये नगरविकास हे महत्वाचे खाते मिळाले पालिकेमध्ये सर्वाधिक भेडसावणारा पाणी योजनेचा प्रश्न संपुष्टात आणला. पाणी योजनेनंतर भुयारी गटार व अंतर्गत रस्त्याचा प्रश्न संपुष्टात येईल, अशी अपेक्षा असताना राज्यात सत्तांतर झाले. आ. तनपुरे यांच्याकडे मंत्री पद असताना कोठेही न दिसणारे विरोधी पक्षातील नेते अचानकपणे जागृत झाले. सत्तांतराने विरोधकांना उर्जा मिळाली. त्यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद लाभताच माजी आ. शिवाजीराव कर्डिले हेसुद्धा अँक्टीव्ह मोडवर आले. विखे-कर्डिले एकी करा म्हणत कार्यकर्त्यांनीही पालिकेत सत्तांतराचा आवाज काढला.
विरोधकांनी मोठा गाजावाजा रीत शहरातील भुयारी गटार योजना मंजूर करून आणली सांगत ब्बल १३२ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्रकार परिषदेत . रावसाहेब चाचा तनपुरे व त्यांच्या समर्थकांनी महसूल मंत्री विखे खा. डॉ. सुजय विखे यांसह माजी आ. कर्डिले यांच्या माध्यमातून निधी मंजुर करण्यात यश मिळविल्याचे सांगत आ. तनपुरेंवर टीका केली.
आ. तनपुरे यांनीही पत्रकार परिषद घेत १३२ कोटी रूपयांसाठी केलेल्या प्रयत्नांची जंत्रीच पत्रकारांपुढे मांडली. परिणामी दोन्ही बाजुने आरोप प्रत्यारपाच्या फैऱ्या झडू लागल्या. तुमचे नगरसेवक आमचे अभिनंदन करीत असल्याचा खुलासाही दोन्ही गटांकडून झाला. दरम्यान, विकास कामांचा श्रेयवाद पेटल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या पारनेर, नगर, कर्जत जामखेड, संगमनेर,कोपरगाव,अकोले आदी तालुक्यात मंजुर विकास कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.केवळ कोट्यावधीच्या बाता केल्या जात आहे.राज्यकर्त्यांना विकासाच्या वाटाच सापडत नाही.शिंदे सरकार पेक्षा भाजपाच्या राज्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टिका चालवल्या आहे.विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलण्यास तयार नाही.कोट्यावधीच्या बाता करुन नेत्यांची जिरवा जिरवी करण्यातच मोठा विकास होत असल्याच्या अविर्भावात जिल्ह्यातील राजकीय नेते दंग आहेत.
श्रेयवाद हा राज्यकर्त्यांचा नित्याचाच विषय ठरत आहे..!
तालुक्यात एखादा मोठा निधी आला व त्यावरून श्रेयाची लढाई झाली नाही, असे कधीच घडले नाही. यापूर्वी जिल्ह्यात प्रशासकीय इमारतीचा प्रश्न असो किंवा तालुक्यातील पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लागलेला असो प्रत्येक विकास कामात श्रेयवाद दिसत आहे.