जामखेड जिल्हा परिषद शाळेवर सीसीटीव्ही वॉच ;तालुक्यातील पहिली सीसीटीव्ही शाळा
जामखेड तालुका प्रतिनिधी :
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मुलामुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी किलबिल भाजी बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी तालुक्यातील पहिली सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा मान शाळेला मिळाला असून संपूर्ण शाळेत विध्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्या आहेत याचा लोकआर्पण करण्यात आला.
मुलां मुलीच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामान्यज्ञान वाढविणे, दैनंदिन व्यवहार, बाजार खरेदी-विक्रीचा व नफा-तोटाचा अनुभव, संवाद कौशल्य, बौद्धिक क्षमता वाढविणे या उद्देशाने शाळेच्या प्रागंणात किलबिल भाजी बाजाराचे आयोजन केले होते. मुलांनी शेतातील विविध पालेभाज्या, फळेभाज्या आणल्या होत्या.विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल विक्रीसाठी मांडले होते. ‘ताजी भाजी, वडापाव स्वस्तात मस्त..’ अशी आरोळी देत ग्राहकांना विद्यार्थी आकर्षित करत होते. खरेदीसाठी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी खरेदीबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. उपक्रमात १०० ते १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हजारोंची उलाढाल झाली. यावेळी बदलापूर येथील घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलात्यानंतर जामखेड तालुक्यात प्रथम जिल्हा परिषद मराठी मुलं मुलीच्या शाळेने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून शाळेच्या आवारात सात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक करण्यात आले.
मुख्याध्यापक संजय कर्डिले ,दत्तात्रेय यादव यांनी नियोजन केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिर सय्यद ,मुलीच्या शाळेचे अध्यक्ष शिवाजी राळेभात,निलेश गायकवाड,संतोष तावरे,निलेश राळेभात ,नितीन टेकाळे,सोमैय्या शेख,योगेश येवले,मयूर टेकाळे,पल्लवी पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्ताराधिकारी नरवडे, केंद्रप्रमुख नवनाथाची बडे, यांनी कौतुक केले आनंद बाजार यशस्वी होण्यासाठी वंदना मोरे, राधा डिसले, अलका धाउड, कालिंदा म्हेत्रे, कल्पना ससाणे, राणी वराडे, कल्पना साबळे, कल्पना मोरे, सारिका पोले, रेखा साळे, सरिता कवडे , शिरीष कदम , नितीन मोहळकर आदींनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन सागर माकुडे यांनी केले.