जीवन तणाव मुक्त होण्यासाठी ग्रंथ, संत आणि भगवंत या त्रिसुत्रीची गरज – गुरुमाऊली प.पु अण्णासाहेब मोरे

0

संगमनेर : जीवन तणाव मुक्त होण्यासाठी ग्रंथ, संत आणि भगवंत या त्रिसुत्रीची गरज असून संस्कारक्षम युवा पिढीला मुल्यशिक्षण आणि बालसंस्कार देण्याबरोबरच निरोगी आरोग्यासाठी कमी खर्चाच्या  सेंद्रीय शेतीला प्राधान्ये देऊन व्यावसायिक दृष्टीकोनातून काम केले तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत असे प्रतिपादन गुरुमाऊली प.पु अण्णासाहेब मोरे यांनी केले.

        श्री स्वामी समर्थ केंद्र, दुर्गापूर आणि उत्तर नगर जिल्हा सेवेकरी यांच्यावतीने येथील केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित शेतकरी सत्संग मेळाव्यात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे बोलत होते.   यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब  म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीलाई विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदुशेठ राठी, उपाध्यक्ष सुनिल जाधव, विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे, शांताराम जोरी, बन्सी तांबे,  प्रवरा अभिमत विद्यापीठ, लोणीचे कुलगुरू डाॅ. व्ही.एन.  मगरे, राज्य प्रांत प्रमुख विजय  कडू, जिल्हाकार्यकारीचे  माणिक वडतेले,रावसाहेब शेजुळ, सुपेकर , बी.डी तांबे.आदीसह जिल्हातील सेवकरी उपस्थित होते. 

     आपल्या मार्गदर्शनात गुरुमाऊली मोरे म्हणाले, आपली संस्कृती ही महान आहे पण ती टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.  वृद्धाश्रम होऊ नये यासाठी  श्रावणबाळ आणि पुंडलिक घडून नवी पिढी घडविण्याचे काम स्वामी समर्थ केंद्रातून होत आहे. अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ असून यामध्ये जात, पात, धर्म आणि पंथ याला थारा देऊ नका. साक्षरता बरोबर  मुल्यशिक्षण, संस्कार, अध्यात्म आणि विज्ञान यांची गरज आहे. शेतकरी हा जगाचा तारक आहे. तो स्वावंलबी झाला पाहीजे यासाठी नव्या तंत्रज्ञानासह, हवामान बद्दल, जमीनी सुपिकता, प्रक्रिया उद्योग, पुरक व्यवसाय आणि कमी खर्चाच्या सेंद्रीय शेतीचा प्रसार करून शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागणार आहे.  आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत विदर्भात आत्महत्या होऊ नये म्हणून विविध कार्यक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ग्राम आणि नागरी विकास अभियानावर मार्गदर्शन करतांना गुरु माऊलीनी बाल संस्कार वास्तुशास्त्र, आयुर्वेद, विवाह संस्कार, वधु-वर नोंदणी, भारतीय संस्कृती आणि अस्मिता,गर्भसंस्कार, पर्यावरण, कृषिशास्त्र यावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केंद्राच्या कार्याचा गौरव करून प्रवरा परिवारांच्यावतीने स्वागत केले. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत हा मार्ग काम करत आहे. या मार्गातून आदर्श तरूणपिढी घडत आहे  असे सांगून कार्यास शुभेच्छा दिल्या

      प्रारंभी प्रास्ताविकांत प्रकाश पुलाटे यांनी २५ वर्षात केंद्रात झालेल्या उपक्रमाचा आढावा देत असतानाच सामाजिक उपक्रमाची माहीती दिली. यावेळी जेष्ठ साहित्यिक यशवंत पुलाटे यांनी मानपत्र वाचन केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश जाधव यांनी तर आभार डॉ. राम तांबे यांनी मानले.

चौकट :- नियोजनाचे प्रवरा मॉडेल..!

कृषि प्रदर्शन, वाहन पार्किंग, बैठक व्यवस्था, महाप्रसाद वितरण, रांगोळीच्या माध्यमातून समृद्ध शेतीचा संदेश, कार्यक्रमानंतर आयोजित परिसर स्वच्छता यातून प्रवरा नियोजनाचा, प्रवरा मॉडेलचा प्रत्यय अनेकांनी घेतला.

चौकट :- कोरोना पुन्हा येणार असला तरी अध्यात्मिक सेवा करून यावर मात  करता येणार आहे. प्रवरेत होणारे बचत गटाचे कार्य आदर्श असेच आहे. कमी लोकसंख्या असतानाही एकता ठेऊन दुर्गापूरकरचा हा कार्यक्रम आदर्श आहे.नगर जिल्हात सेवा मार्गाच्या कार्यात महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची कायम मदत होते.

                    – गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here