जामखेड तालुका प्रतिनिधी – श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली या स्थानकवासी जैन समाजाच्या मातृ संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्र राज्याची निवडणूक लागली असून चतुर्थ झोन बिनविरोध झाली असून जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची या कार्यकारणीत वर्णी लागली आहे. त्यांना चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संजय कोठारी यांचा सत्कार करण्यात आला .
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची २००५ साली महाराष्ट्र प्रान्तीय युवा शाखा पदी निवड झाली होती नंतर २०१६ ते २०२८ भरघोस मताने निवडून आले तसेच २०१८ते २०२१ व २०२१ ते २०२३ पुन्हा राष्ट्रीय कार्यकारणी पदावर बिनविरोध निवड झाली होती सामाजिक कार्यकरते संजय कोठारी हे त्यांचे आजोबा स्वर्गवासी सुवालाल कोठारी प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक कार्यक्रम गेली ३५ वर्षा पासुन राबवित आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची दिल्ली च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आता चौथ्यांचा बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
गेली दहा वर्षापासून जैन कॉन्फरन्स याच बॅनरखाली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी विविध कार्यक्रम घेत आहेत. यामध्ये सहा हजाराच्या वर अपघातातील जखमींना आपल्या रुग्णवाहिकेत मोफत आणून वाचवण्यास मदत केली ,सर्व रोग निदान शिबिर, देहदान संकल्प अभियान ,रक्तदान शिबिरे ,वृक्षारोपण, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत तसेच प्राण्यांना हिरवा चारा ,जखमी प्राण्यांना आणून पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करून वनविभागाच्या सहाय्याने पुन्हा सोडण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप ,शालेय गणवेश वाटप, कोरोणा काळामध्ये सर्वांना मदत अशी कार्य केल्याबद्दल त्यांना या संस्थेवर बिनविरोध पुन्हा घेण्यात आलेले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा सत्कार करण्यात आला या वेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ओंकार दळवी, उपाध्यक्ष समीर शेख, पत्रकार दत्तराज पवार, जि.उपध्याक्ष लियाकत शेख, प्रा.शिवाजी भोसले,प्रा.धंनजय भोसले, किरण शिंदे आदी उपस्थित होते.