टेंपो-जेसीबी-दुचाकीच्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                राहुरी तालुक्यातील कणगर येथिल खिंडीत टेंपो व मोटारसायकल समोरासमोर धडक होवून मोटारचालक उडून जेसीबीवर आदळल्याने तिहेरी अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. या अपघातात सोमनाथ बाबुराव बलमे वय २७ (रा. वडनेर ता.राहुरी ) ठार झालेल्या व्यक्तीचे  नाव असुन हा अपघात रविवारी सायंकाळी ५ वा.घडला.

           

या बाबत समजलेली माहिती अशी की,सोमनाथ बाबुराव बलमे हा राहुरी फँक्टरी येथुन वडनेरकडे जात असताना कणगर येथिल खिंडीत समोरुन आलेल्या तीन चाकी मालवाहतुक टेंपो (एमएच 17 बीडी 2115) ने  मोटारसायकलस्वारास जोराची धडक दिली.मोटारसायकल चालक उडून शेजारुन जाणाऱ्या जेसीबीवर आदळल्याने जागिच ठार झाला.

               अपघाता नंतर सोमनाथ बलमे यास रविंद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहीकातुन प्रथम राहुरी फँक्टरी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.परंतू वैद्यकीय सुञांनी उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मृतदेह राहुरी येथिल सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.सोमवारी सकाळी शवविच्छेदन केल्या नंतर बलमे याच्या वडनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. टेंपो चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               सोमनाथ बाबुराव बलमे याच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.पुढील तपास राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ जानकीराम खेमनर हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here