डाऊच खुर्द जिल्हा परिषद शाळा म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्रच : संजय गुरसळ

0

कोपरगाव ( वार्ताहर) : डाऊच खुर्द प्राथमिक शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ नेहमी प्रयत्नशील असतात. संपूर्ण शाळा डिजिटल बनवून येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदादाचे धडे दिले जातात.त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी देखील याच शाळेत दाखल झाल्याने शाळेचा दर्जा उत्तम असल्याचे कळते जिल्हा परिषदेची डाऊच खुर्द शाळा म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्रच आहे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शक  माजी सरपंच संजय गुरसळ यांनी केले.

ते काल शाळेमध्ये 55 इंच all in one computer स्मार्ट बोर्ड बसवताना बोलत होते. डिजिटल स्कूल संकल्पना योजने अंतर्गत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या प्रयत्नातून नावीन्य पूर्ण योजना 2022-2023 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊच खुर्द ला 55 इंच all in one computer प्राप्त झाला आहे . 

शाळेच्या एका वर्गात हा टीव्ही संच बसून त्या डिजिटल वर्गाचे माजी सरपंच संजय गुरसळ यांनी रिमोटच्या साह्याने टीव्ही चालू करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुला करून दिला. यावेळी भैय्यासाहेब सय्यद ,सलीम सय्यद भाई ,अक्षय रणधीर, सुभाष पुंगळ, देवा पवार ,प्रवीण गुरसळ ,सकाराम बढे ,बाळासाहेब पिठे ,दिगंबर पवार , जिनिंग प्रेसिंग चे संचालक शंकरराव गुरसळ , मच्छिंद्र गुरसळ , चंद्रकांत पवार , ग्रामसेवक जालिंदर पाडेकर,  केंद्रप्रमुक श्री  घुले , मुख्याध्यापक अशोक थोरात, मुख्याध्यापक श्री सय्यद, मुख्याध्यापक श्री शेख, मुख्याध्यापक श्री मोकळ, धनराज जाधव ,मनीषा बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज जाधव यांनी केले तर आभार मनीषा बनसोडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here