कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील साई गाव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . साई मित्र मंडळ डाऊच खुर्दच्या वतीने करण्यात आले. डाऊच खुर्द गावातून या पालखीचे सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले. डीजेच्या वाद्यावर साईबाबांच्या भक्ती गीतांचा मनमुराद आनंद पालखी सोहळ्यातील भाविकांनी घेतला. पालखी सोहळ्यामध्ये डाऊच खुर्द पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष होते. पालखी सोहळ्यामधील महिला व ग्रामस्थांसाठी ठीक ठिकाणी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी ही पालखी शिर्डी येथे दाखल झाली. श्री साईबाबा चे दर्शन घेत महाप्रसाद घेऊन ही पालखी पुन्हा गावाच्या दिशेने रवाना झाली. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी डाऊच खुर्द साई मित्र मंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.