कोपरगांव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ. निता शिंदे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.
सौ. निता शिंदे यांनी “सायटेशन अंनालिसिस ऑफ डॉक्टरेल थिएसिस सबमिटेड टू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी” या विषयावर आपले शोधकार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बी.एम.पानगे यांचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त डॉ.एस के पाटील, एनसीएल चे डॉ. एन. बी. दहिभाते, डॉ. राजेंद्र कुंभार, विभाग प्रमुख डॉ. सदानंद बनसोडे यांचेही मार्गदर्शन मिळाले.
त्यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी प्राप्त केलेल्या या पदवी बद्दल पंचक्रोशीतुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.