डॉ. राहुल गुडघे डीएम कार्डिओलॉजिस्ट मध्ये गोल्डमेडलिस्ट

0

अनेक वर्षानी अहमदनगर जिल्ह्यात डॉ गुडघे यांनी गोल्ड मेडलिस्ट मिळवले 

पोहेगांव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय दौलतराव गुडघे यांचे चिरंजीव डॉ राहुल दत्तात्रय गुडघे यांनी अहमदनगर जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला असून काल 22 मे रोजी झालेल्या डीएम कार्डिओलॉजिस्ट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस राजस्थान येथे डीएम कार्डिओलॉजिस्टचे ते शिक्षण घेत होते. या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत गोल्ड मेडलिस्टचे ही मानकरी ठरले आहे.डॉक्टर राहूल गुडघे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाले. व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी एस एस जी एमकॉलेजमध्ये घेतले.

त्यांचा एमबीबीएस साठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे नंबर लागला. तेथे त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. एमडी मेडिसिन  त्यांनी सायन हॉस्पिटल मुंबई येथे पुर्ण केले.

तर डीएम कार्डोलॉजिस्ट साठी जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस राजस्थान येथे त्यांनी शिक्षण घेतले.या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते डीएम पर्यंत ते टॉपर्स राहिले. आपला प्रथम क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही.जोधपूर येथे सहा महिन्यापूर्वी 

घेण्यात आलेल्या देश-विदेशातील कार्डिओलॉजिस्ट कॉन्फरन्स स्पर्धेत सर्वच प्रश्नाचे अचूक उत्तर देत ते प्रथम आले होते.डॉक्टर गुडघे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सोनेवाडी पंचकोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुरवातीपासूनच डॉ. राहुल गुडघे अभ्यासात हुशार होते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवण्यासाठी त्यांची धडपड  सुरू होती. आमच्या कुटुंबांनेही त्यांच्या शिक्षणासाठी कुठलीच कसूर ठेवली नाही. आज मिळालेल्या त्यांच्या यशामुळे समाधानी झालो आहोत. 

निश्चित ध्येय गाठण्यासाठी जिद्द चिकाटी व प्रचंड मेहनत कामी येते आज मिळालेल्या माझ्या यशामध्ये माझे संपूर्ण कुटुंब, पत्नी डॉ विनिता गुडघे, आई वडील काका व माझे शिक्षक यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. डॉ राहुल गुडघे डीएम कार्डिओलॉजिस्ट गोल्ड मेडलिस्ट 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here