नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.रविंद्र नवथर, डॉ.दिपक विधाते यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अभ्यासमंडळावर निवड झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीमधील डॉ.नवथर व डॉ.विधाते या दोघांची ‘मेकॅनिकल अॅण्ड ऑटोमोबाईल इंजिनिअरींग व माहिती तंत्रज्ञान’ या विषयाच्या अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून विद्यापीठाने निवड केली, असे प्राचार्य उदय नाईक यांनी सांगितले.
या निवडीबद्दल महाविद्यालयाच्यावतीने संस्थेचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी डॉ.नवथर, डॉ.विधाते यांचा सत्कार केला. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या निवडीमुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले त्यांच्या या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील, प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.