कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष आमच्या तीन पिढ्याने ज्या गटाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक काम केले त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मात्र ज्यावेळी आ. आशुतोष काळे यांच्याकडे विकासकामे घेवून गेलो त्यावेळी त्यांनी मी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या गटाचा आहे याचा विचार न करता आणलेले काम नागरिकांच्या किती महत्वाचे आहे याचा विचार करून तातडीने त्या कामाला हिरवा कंदील देवून ती कामे पूर्ण देखील झाली आहेत. त्यामुळे विकासाला प्राधान्य देणाऱ्या आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असल्याचे सांगत कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील कोल्हे गटाच्या माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच काळे गटात प्रवेश केला आहे.
आ. आशुतोष काळे पूर्व भागाच्या दौऱ्यावर असतांना तळेगाव मळे येथे एका कार्यक्रमात कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे गटात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये विजय टुपके, पंकज टुपके, जगन वाकचौरे, प्रशांत टुपके, संजय टुपके, साहेबराव टुपके, शरद टुपके, अशोकराव वगदे, दत्तात्रय वगदे, विजय वगदे, रामनाथ मोरे, संजय टुपके, सुदामराव कदम, सुखदेव टुपके, ज्ञानेश्वर टुपके, विनायक जाधव, बाजीराव जाधव, सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी काळे गटात प्रवेश करणारे कोल्हे गटाचे माजी सरपंच विजय टुपके यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, सर्वाना समजून घेवून सर्वाना सोबत घेणारे आ. आशुतोष काळे यांनी मागील साडे चार वर्षात सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे करून विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.मतदार संघातील विकास कामे करतांना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांनी विकासाला प्राधान्य दिले आहे.त्यामुळे मतदार संघासह आमच्या तळेगाव मळे गावाचा अधिकचा विकास होण्यासाठी आ.आशुतोष काळेंचे नेतृत्व मतदार संघासाठी आवश्यक असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काळे गटात प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी तळेगाव मळेसह पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.