जामखेड तालुका प्रतिनिधी :
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू झाले असून पोटाला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढत चालली आहे. जामखेड शहरातील बीड रोड वरील एका ताकाच्या दुकानातून घेतल्याला ताक मध्ये चक्क एक नव्हे तर ३ ते ४ मृत अवस्थेतील झुरळ दिसून आले असून एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार सध्या जामखेड शहरात सुरु आहे याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे
उन्हाळ्याचे दिवस असल्याचे लाही लाही होत आहे याचंच फायदा घेत ज्युसबार,लस्सी,ताक,रस आदींसह थंडपेयांची विविध दुकाने चौका चौकात थाटली आहे ,मात्र थंडपेयाची विक्री करताना स्वच्छेतेची काळजी घेतली जात नसल्याचे धक्कादायक माहिती पुढे येत असून जामखेड शहरातील एका प्रसिद्ध ताकाच्या दुकानातून विकत घेतलेल्या ताकामध्ये ३ ते ४ मृत अवस्थेतील झुरळ निघाले आहे याबाबत संबधित दुकानदाराला विचारणा केली असताना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली मात्र या प्रकारे झुरळ निघत असून एकप्रकारे जामखेडकरांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजचे बनले आहे अन्न भेसळ अधिकारी यांचे जामखेड तालुक्यात दुर्लक्ष होत असताना दिसत आहे अशा व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांनी केली आहे