तालुक्यातील तरुणांसाठी नोकरी भरती मेळावे घ्यावेत : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

0

 कोपरगाव : ज्याप्रमाणे दरवर्षी कोपरगाव शहर व तालुक्यातील छोट्या उद्योगांना वाव देण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी बिझनेस एक्सपो भरवला जातो , त्याच धर्तीवर कोपरगाव शहर व तालुक्यातील शिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींन नोकरी मिळवून देण्यासाठी नोकर भरती मेळावे किंवा जॉब एक्सपो कोपरगाव शहरात होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.

याबाबत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोपरगाव शहर आणि तालुक्यात अनेक क्षेत्रातील कुशल युवक व युवती नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र इच्छा असूनही त्यांना संधी मिळत नाही . याकरिता कोपरगाव शहर व तालुक्यातील सामाजिक संघटनांनी दर दोन वर्षाला सर्वांनी एकत्र येऊन बिजनेस एक्सपो प्रमाणे नोकर भरती मेळावा , जॉब एक्सपो आयोजित केल्यास येथील स्थानिक तरुणांना रोजगार आणि नोकरी मिळेल. अशी सूचना पाटील यांनी मांडली आहे.

      पाटील यांनी पुढे म्हटले आहे की प्राथमिक स्वरूपात आपल्या जवळच असलेल्या संभाजीनगर ( औरंगाबाद) , अहिल्यानगर ( नगर ) , नासिक , पुणे या भागातील कंपन्यांशी संपर्क साधून व कोपरगाव तालुक्यातील बाहेरगावी शिकून गेलेले ज्यांच्या मोठमोठ्या कंपन्या पण आहेत व मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत असणारे अधिकारी यांच्याशीही संपर्क साधून , त्यांनाही यात सामील करून तालुक्यातील इतर तरुणांना कसं रोजगार देता येईल नोकरीला लावता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

           दहावी,  बारावी , बीकॉम , बीए बीएससी , ग्रॅज्युएट ,कुठल्याही क्षेत्रातील इंजिनियर , नरसिंग , बीबीए , एमबीए , छोटे कोर्सेस असे वेगवेगळे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील युवकांसाठी व युवतींसाठी , सर्वांनी जर एकत्र येऊन निस्वार्थीपणे आपल्या तालुक्यातील युवकांसाठी रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे या युवकांना व त्यांच्या कुटुंबांना या माध्यमातून मोठा हातभार लागेल व एक मोठा आदर्श या युवकांपुढे आपल्या गावातील पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उभा राहील.

           तसेच भविष्यात कोपरगाव व शिर्डी मध्ये सावळीवीहीर मध्ये मोठी MIDC घोषित झाली आहे व समृद्धी महामार्गाला खेटून कोपरगाव तालुक्यात स्मार्ट सिटी चे नियोजन सरकारचे आहे. यामध्ये मोठ मोठ्या कंपन्या येणार आहेत सुरू होणार आहेत असे कळते. याचे काम होईपर्यंत दोन-तीन वर्षात हे युवक अनुभव घेऊन पुन्हा आपल्या तालुक्यातील असणाऱ्या कंपन्यांमध्ये जास्त पगारावर येऊ शकतात व आपल्याच तालुक्यात राहून त्यांचा खर्चही कमी होऊ शकतो व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाण्यासाठी हे युवक आपल्या कुटुंबासोबत येऊन राहू शकतात . असं दुहेरी फायदा या तरुणांना , गावाला  व त्यांच्या कुटुंबाला होईल. तसेच भविष्यात शिर्डी किंवा कोपरगाव ही जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय होणार असणारे निश्चितपणे इथे व्यापार चांगला वाढणार आहे .यासाठी आत्ताच जर एकत्र आलो आणि हा मेळावा घेतला तर निश्चितपणे आपल्या तालुक्यासाठी ही खूप मोठं काम असेल. आपलं तालुक्यातील मुला-मुलींमध्ये खूप चांगले काम करण्याचे स्किल आहे. परंतु ओळख , माहिती व वशिला नसल्याने नोकरी मिळणे , काम मिळवणे अवघड झाली आहे . तसेच जे नोकरी करून बाहेर अनुभवी होतील ते तालुक्यातील इतर तरुणांना छोटी छोटी उद्योग व्यवसाय कशे उभारावे व कोणते उभारायचे याची माहिती देऊ शकतील,  जेणेकरून छोटी छोटी उद्योगही आपल्या तालुक्यात उभे राहतील व यामुळे चलनवाढीसाठी व व्यापार वाढीसाठी तालुक्याला प्रत्येक कुटुंबाला त्याचा उपयोग होईल. हयासाठी माझे संपूर्णपणे योगदान या रोजगार मेळाव्यासाठी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here