तालुक्यातील रस्त्यांसाठी ३ कोटी १० लाख निधी मंजूर ; माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचा पाठपुरा

0

संगमनेर  : काँग्रेसचेे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून मोठा निधी मिळवत तालुक्यातील वाडी – वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांमधून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२- २३ मधून ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. 

             याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम आहे.तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील १७१ गावे व २५० च्या पुढे वाड्यावस्ती आहेत. विविध गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक  लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध कामांमधून जिल्हा वार्षिक योजना  २०२२- २३ मधून ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांना ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.या अंतर्गत चिंचपूर मळई वस्ती ते प्रतापूर, निमगाव जाळी रस्ता मजबुतीकरण १५ लाख रुपये, पांढरी रस्ता ते मांची हिल रस्ता १५ लाख रुपये, घुलेवाडी एकता चौक ते साई श्रद्धा चौक रस्ता खडीकरण व डाबरीकरण १५ लाख रुपये ,गुंजाळवाडी आरगडे मळा गेट ते गुंजाळवाडी चौफुली रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण्यासाठी १० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ५० ते मंगळापूर कसारा दुमाला रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण्यासाठी १० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ५० ते करमाळा रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, कौठे धांदरफळ क्षीरसागर मळा ते सांगवी रस्ता डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये, सारोळे पठार ,धारवडवाडी ,माळेगाव पठार रस्ता मजबुतीकरण १५ लाख रुपये, कौठे बु. ते पौसावाडी रस्ता १५ लाख रुपये ,चिंचोली गुरव, वामानवाडी, बोडकेवाडी तळेगाव रस्ता १५ लाख रुपये, निमगाव खुर्द ते काशाई मंदिर डाबरीकरण करणे १० लाख रुपये, रायतेवाडी तनपुरे वस्ती ते दिघे वस्ती चौगुले पर्यंत रस्त्याची खडीकरण करणे १० लाख रुपये , मोरदरा, पेमगिरी येलूशी वाडी रस्ता मजबुतीकरण व डाबरीकरण कामासाठी १० लाख रुपये, खांडगाव ते ग्रामीण रस्ता १५७ मजबुतीकरण १० लाख रुपयेे, सावरचोळ ते चंदगड रस्ता १० लाख रुपये ,मनोली ते शिंदे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २० लाख रुपये, निमोन क-हे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २० लाख रुपये, तळेगाव ते घोडमाळ,  देवकवठे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २० लाख रुपये , घुलेवाडी ते खांजापूर रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे २० लाख रुपये , सायखिंडी रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग डाबरीकरण करणे २० लाख रुपये सोनेवाडी ते मालदाड रस्ता डांबरीकरण करणे २० लाख रुपये आशा या कामांसाठी एकूण ३ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.आ. बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेली ही कामे तातडीने सुरू होणार असल्याने, निमगाव जाळी, मांची हिल, गुंजाळवाडी, कसारा दुमाला, मंगळापुर, धांदरफळ खुर्द व बुद्रुक, सारोळे पठार, माळेगाव पठार , कौठे बु, चिंचोली गुरव, देवकवठे,  रायतेवाडी, पेमगिरी, सावरचोळ, खांडगाव, तळेगाव, घुलेवाडी, सायखिंडी, सोनेवाडी, मालदाड, मनोली , निमोन, क-हे, साईश्रद्धा चौक, या परिसरातील नागरिकांनी राज्याचे नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.


निळवंडे कालव्यासाठी आ.थोरात यांचाच पाठपुरावा..!
आमदार बाळासाहेब थोरात यांनी अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले असून कालव्यांच्या कामासाठी त्यांनीच पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात जास्त निधी मिळवुन  ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू ठेवले होते, मात्र सरकार बदलले आणि सदर कामाला स्थगिती मिळाली आहे. तरीही आमदार बाळासाहेब थोरात हेच या कालव्याच्या कामासाठी पाठपुरावा करत असून तेच शेतकऱ्यांना पाणी देतील असा विश्वास दुष्काळी भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here