कोपरगांव :- कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांना रोख पेमेंट करण्यात येत आहे. यामुळे धनादेश वटनावळ व बँकांच्या शुक्लकाष्टातुन शेतक-यांची सुटका झालेली आहे. शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांच्या हातात रोख पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्रीनंतर शेतमालाचे पेमेंट धनादेशाने अदा करण्यात येत होते. शेतमालाचा मोबदला धनादेशाने मिळाल्याने एक तर बँकांच्या अडचणी आणि त्यात धनादेश वटण्यास लागणारा १५ दिवस ते महिन्याचा कालावधी यामुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
याबाबत अनेक शेतक-यांनी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तक्रारी केल्या होत्या. यामुळे बाजार समिती संचालक मंडळाचे निर्णयामुळे मुख्य मार्केट यार्ड कोपरगांव व उपबाजार आवार तिळवणी या दोन्ही ठिकाणी शेतमाल विक्रीनंतर शेतक-यांना शेतमाल विक्रीचे दिवशीच रोख पेमेंट देण्यात येत आहे. अशी माहिती सभापती साहेबराव पा.रोहोम व उपसभापती गोवर्धन पा. परजणे यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल विक्रीचे दिवशीच संबंधित व्यापा-यांकडून पेमेंट रोख स्वरूपात पेमेंट घेवुन जावे. धनादेश अथवा RTGS ने पेमेंट स्विकारू नये. पेमेंटबाबत काही तक्रार असल्यास बाजार समिती कार्यालयात त्वरीत सपर्क साधवा शेतक-यांनी पेमेंट बाकी ठेवल्यास सदरचे पेमेंट व्यक्तीगत संबंधातुन ठेवले आहे. असे गृहीत धरण्यात येईल. त्याची जबाबदारी बाजार समितीवर राहाणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमाल विक्रीचे दिवशीच संबंधित व्यापा-याकडून रोख पेमेंट घ्यावे. असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.