तीन वाळू तस्कर एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार 

0

संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यातील तिघांना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या तिघांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते वाळू तस्कर असल्याचे समजते. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांच्या या आदेशाने वाळू तस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

         अरबाज करीम शेख (रा.जोवेॅ रोड, संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा.धांदरफळ खुर्द) आणि मंगेश सुरेश घुले (रा.शितला माता मंदिराजवळ संगमनेर) या तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी वरील  तिघांना अहमदनगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सादर केला होता. पोलिसांनी पाठवलेले हे  प्रस्ताव वस्तुनिष्ठ असल्याबाबतचे समाधान प्रांताधिकार्‍यांचे झाल्याने त्यांनी वरील तिघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेले हे तिघे वाळू तस्कर असल्याचे समजते. त्यामुळे तालुक्यातील आणि शहरातील वाळू तस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here