अभिता नवलाखा यांच्या कल्पनेतून वर्गातील सर्व विद्यार्थिनी मिळून दिला एक लाख रुपयाचा निधी
जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी यांनी इयत्ता दहावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी, तसेच उद्योग- व्यवसायासाठी एकमेकांपासून दूर गेलेले माजी विद्यार्थी तब्बल तीस वर्षांनी एकत्र आले.
सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना येण्यासाठी सोयिस्कर होण्यासाठी अहमदनगरला गेट-टुगेदर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिमखाना या ठिकाणी मंगळवारी (ता. ११) सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले.
सन १९९३ मध्ये दहावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सर्वच विद्यार्थ्यांना गाव सोडावे लागले. काही विद्यार्थी उच्चशिक्षित बनून चांगले अधिकारी झाले. काही विद्यार्थी उद्योग- व्यवसायात, तर काही पारंपरिक शेतीव्यवसायात रमले. मात्र,शाळेच्या आठवणी कायम राहिल्या. यातूनच प्रारंभी सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर नंतर स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थी पाच वर्षांपूर्वीच एकत्र आले. मंगळवारी नगर येथे झालेल्या गेट-टुगेदरला १३ माजी विद्यार्थिनी उपस्थित राहू शकल्या, हे विशेष.आयोजन करण्यासाठी पुणेस्थित चैताली कोठारी – फुलफगर, अभिता संचेती नवलाखा, मनीषा मंडलेचा बंब यांच्यासह रामदास मते यांनी पुढाकार घेतला. यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यापासून ठिकाण निश्चित करून तेथील सर्व नियोजन करण्याचे काम त्यांनी केले.
चौकट-
सदर माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुप मधील महिलांचा सामाजिक कार्याला हातभार म्हणुन अभिता नवलाखा यांच्या कल्पनेतून ,शाळेचं काही तरी देण ,या हेतुने शाळेसाठी मुलींसाठी वर्गणी करून,एक लाख निधी देऊन शौचालय बांधकामासाठी रक्कम देण्यात आले. तसेच कन्यादान योजना ,व अडीअडचणी मध्ये ,मदतीचे उपक्रम राबविले जातात ,हा आता ग्रुप नसुन ७० विद्यार्थ्यांचा परिवार झाला आहे.हे सर्व यातील सर्व महिलांचं योगदान आहे,