कुकाणा प्रतिनिधी ,नेवासा :
सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा कौतुक सन्मान करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले.
कुकाणे गोडेगाव येथील जनकल्याण फाउंडेशनतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी पुरस्कारार्थी. गोडेगाव येथे जनकल्याण फाउंडेशनतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून संत तुकडोजी महाराज पुरस्कारांचे वितरण शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या हस्ते, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आरगडे, ज्ञानेश्वर चे ज्येष्ठ संचालक अँड देसाई देशमुख,बाबा आरगडे, अँड बन्सी सातपुते, अध्यक्ष पांडुरंग रोडगे ,आदि मान्यवर उपस्थित होते.सुकदेव फुलारी (समाजभूषण), राजेंद्र देसाई (पत्रकारिता) दादासाहेब आरगडे (आदर्श ग्रामसेवक), शिवशाहीर अक्षय डांगरे (कलावंत), अनिता कानडे, पाथर्डी (आदर्श शिक्षिका), अनिल सरोदे (ग्रंथपाल), अलका सातपुते (आदर्श आरोग्य सेविका) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संतोष रोडगे, रावण गारुडे, गोताराम रोडगे, बाबासाहेब महाराज रोडगे, तुळशीराम तुपे, पोपट उगले, राहुल कोळसे, रमेश पाडळे, संतोष औताडे, मनीष रोडगे, अण्णासाहेब वाघुले, अशोक यावेळी (साहित्य), उपस्थित होते. प्रा. राजेंद्र गवळी , अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले. जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी आभार मानले. .फोटोच्या ओळी : आदर्श ग्रंथपालचा पुरस्कार अनिल सरोदे यांना प्रदान करतांना अरूण कडू, अँड.देसाई देशमुख,बाबा आरगडे , सुकदेव फुलारी आदि मान्यवर (छाया: ईस्माइल शेख)