कोपरगाव प्रतिनिधी : काल कोपरगाव शहराजवळील स्टेशन रस्त्यावरील वृक्षाना अज्ञात समाज कंटकाने लावलेल्या आगीमध्ये अनेक वृक्ष जळून खाक झाले होते .मात्र त्याची वनखाते आणि किंवा शासनाच्या संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने त्या निषेधार्थ सामजिक कार्यकते संजय काळे या वृक्षांचा दशक्रिया विधी करणार आहे.
याबाबत काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की काल २६ मार्च २०२५ रोजी.. कोपरगाव येथील साईबाबा चौफुली ते औद्योगिक वसाहत रस्त्यालगत वृक्षरोपण केलेली वृक्ष समाज कंटकाने जाळली..हा अपघात निश्चित नव्हता.. आज आठ्ठेचाळीस तास उलटले तरी महसूल, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगाव नगरपरिषद, पोलीस विभाग यांनी जळीता मुळे किती वृक्ष जळाली, किती नुकसान झाले, आग कशी लागली हे पाहण्यासाठी वेळ काढला नाही.. पंचनामा केला नाही..या सर्व विभागातील सातवा वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्या़ंचा, वृक्षां प्रति असलेली अनास्था, निर्दयी पणा यांचा निषेध व्यक्त करतो..
मागील वर्षी देखील वीस वृक्ष जाळले होते. त्या ठिकाणी आम्ही परत लावले. तसे पहिले तर वृक लागवड करण्याची जबाबदारी या शासकीय विभाग आणि अधिकाऱ्यांची आहे. मात्र ते आपली जबाबदारी विसरले आहेत. त्यामुळे रविवारी दि ३० मार्च रोजी आम्ही जळालेल्या जागेवर नवीन वटवृक्ष लावणार आहोत. तसेच या घटनेची प्रशासनाने दखल घेतली नाही चौकशी केली नाही, घटनेचा गुन्हा दाखल केला नाही. म्हणून शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी पशू पैदास क्षेत्र च्या गेट समोर सत्याग्रह रुपी दशक्रिया विधी करणार असल्याचा इशारा काळे यांनी प्रशासनाला दिला आहे.