त्रिदल आजी माजी सैनिक संघाच्या वतीने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहरात त्रिदल आजी माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमी च्या वतीने जुने बसस्थानक ते लना होंशीग विद्यालय पर्यंत तिरंगा रॅली काढुन जय जवान जय किसान च्या घोषणा देऊन कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला व यावेळी त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचा दुसरा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला तसेच कारगिल युद्धा मध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना शहीद पत्नी रोहीनी जगताप व सर्व बहादुर जवानांकडुन  आदरांजली अर्पण करण्यात आली 

१९९९ मध्ये ३ मे ते २६ जुलै भारतीय सैन्याने पाकिस्तान सेने विरूध्द कारगील युद्धात विजय मिळवून अशक्य ते शक्य करून दाखवले त्या मध्ये तोलोलींग, टायगर हील इत्यादी पाकिस्तान ने कब्जा केलेली ठाणी भारतीय जाबाज सैन्याने मोठ्या धडाडीने जिंकली म्हणूनच २६ जुलै  कारगिल विजय दिवस साजरा केला जातो 

या कार्यक्रमाची सुरुवात शहीदों कि चिताओं पर लगेंगे हरबरस मेले, वतन पर मरने वाले यही बाकी निशा होंगे” या देशपक्तीं च्या वाक्याने संघाचे सचिव शहाजी ढेपे यांनी केली तर प्रास्तावना उपाध्यक्ष कांतीलाल कवादे यांनी केली व आभार अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले व यावेळी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, मुख्याधिकारी अजय साळवे, प्रा.मधुकर राळेभात, मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, एसबीआयचे शाखाउपधिकारी अनिल भोसले,मा. नगरसेवक डिगांबर चव्हाण, भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, संघ अध्यक्ष पाटोदा  शिवाजी पवार इत्यादीनी मनोगत व्यक्त केले 

यावेळी  कार्यक्रम प्रसंगी विरनारी संगीता घोलप, विजया पवार, सुनीता पवार व शोभा नागरगोजे, कल्पना सांगळे, कोल्हे मॅडम, त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सदस्य सुग्रीव अडाळे, राजकुमार भराटे, शांतीलाल जायभाय, अरविंद जाधव, हरिभाऊ कदम, अमोल राऊत, पोपट सांगळे, नानासाहेब कार्ले, सुर्यकांत खर्डे, अशोक चव्हाण, जगन्नाथ धर्माधिकारी, बळीराम ढाळे, वंसत माळवे, नवनाथ आंधळे, रामचंद्र वाळुंजकर, बबन नाईक, नंदकुमार नागवडे, जयसिंग तुपेरे, विजय नागरगोजे, दत्तात्रय डिसले, चंद्रकांत साळवे, मनोज निमोणकर, त्रिंबक जगदाळे, रामेश्वर यादव, सानप मेजर, गोरख अजबे, कचरू घोडके, महादेव कार्ले, गणेश कदम, आष्टी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, दादासाहेब खेडकर, कारगिल युद्धा रोहिदास पगारे, सतीश ढवळे व तसेच शिवनेरी अॅकडमी, आयटीआय, लोकमान्य शाळेचे विद्यार्थी यांच्या सह आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here