नेवासा प्रतिनिधी : सकल हिंदू संघटनेच्या वतीने शेवगाव व त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा निषेध म्हणून कुकाणा शहरात् कडकडीत बंद ठेवून मूकमोर्चा काढण्यात आला. शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. निषेध सभेत, शेवगाव येथील छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेचं त्या घटनेत घोषणा देणारावर् सहभाग् देशद्राह गुन्हा दाखल करावा आशी मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळीं मोठा पोलिस बंदोबस्त होता.कुकाणा सकल हिंदू संघटनेच्या वतीने पोलिस ठाण्यास निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. (छायाचित्र : इस्माईल शेख )