थोरात कारखान्याकडून ऊस पिकासाठी एक रुपया दराने ऊस रोपे देणार – बाबा ओहोळ 

0

संगमनेर : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या व राज्यातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उसाच्या एकरी उत्पादन वाढी करिता कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस बेणे, अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत, पेप्सी लॅटरल यांसह विविध योजना सुरू केल्या असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
            कारखान्याच्या या योजनेबाबत अधिक माहिती देताना ओहोळ पुढे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी कारखान्याने १५ लाख ५१ हजार मे़ टन उच्चांकी गाळप केले आहे.
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. संचालक मंडळाने दि.१ जानेवारी २०२३ नंतर सुरु ऊस लागवड व खोडवा निडवा पीक घेणार्‍या ऊस उत्पादकांसाठी ५० टक्के अनुदानावर अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत तसेच दि.१ जानेवारी २०२३ पासून पुढे सुरु ऊस लागवडीसाठी १० हजार रुपये एकरी बेणे रक्कम वसुलीच्या अटीवर देण्याचा निर्णय घेतला आहे.याचबरोबर सन २०२३ – २०२४ ऊस गळित हंगामासाठी दि.१९ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू ऊस लागवडी करतील त्यांना १ रुपये प्रति रोपाने ऊस रोप देण्यात येणार आहे.तसेच २०२३ – २४ करिता नोंद केलेल्या अशा शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी ४००० मिटर पर्यंत पेप्सी लॅटरल मागणी केल्यास वसुलीच्या अटीवर उधारीने पेप्सी लॅटरल देण्यात येणार आहे 
याबाबत अधिक माहितीकरीता कारखाना शेती ऑफिस किंवा गट ऑफिस येथे संपर्क साधावा तसेच या योजनेचा जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  व्हाईस चेअरमन संतोष हासे सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here